शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
डॉ संजय रोडगे मित्र मंडळाचा उपक्रम वाहनाची मोफत व्यवस्था श्रीराम प्रतिष्ठान व डॉ. संजय दादा रोडगे मित्र मंडळ यांच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त मंठा येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी आज शिराळा व घोडके पिंपरी येथील महिलांना मोफत गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
जिल्हा परिषद रवळगाव सर्कल मधील विविध गावातील महिलांना आज रेणुका माता देवी दर्शन मंठा करिता नेण्यात आले. सेलू येथे वापस आल्या नंतर डॉ. सविता रोडगे यांनी महिलांशी संवाद साधला असता त्यांनी आपुलकीने दर्शन व प्रवासासंबधी विचारपुस केली. यावेळी सर्व महिलांना रेणुका मातेचा फोटो सह फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. याप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ सविता रोडगे, प्रा. महादेव साबळे, उद्धवराव खेडेकर, कल्याण खेडेकर, वसंतराव खेडेकर, योगेश खेडेकर विनोद शिंदे, भास्कराव घोडके, रामभाऊ घोडके डाॅ. संजय रोडगे मित्र मंडळाचे प्रकाश गजमल, संजय गटकळ, दत्ताराव लाटे तसेच शिराळा व घोडके पिंपरी येथील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.