प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.१६ ऑक्टोबर सोमवार रोजी आझाद मैदान मुंबई येथे ब्राह्मण समाजास भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावे यासाठी पदुदेव जोशी, व अविनाश जोशी, यांनी आझाद मैदान मुंबई येथे दि. १६ ऑक्टोंबर रोजी आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे .यांच्या या उपोषणास नानाविध अनेक ब्राह्मण संघटनांनी आपापल्या परीने पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत ब्राह्मण समाजास परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळणार नाही तोपर्यंत हे अमर उपोषण चालूच राहणार असे पदुदेव जोशी व अविनाश जोशी यांनी सांगितले . तसेच असेया उपोषणास पंचमुखी हनुमान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पाथरीच्या वतीने जाहीरपाठिंबा दिला आहे. तसेच मा.आ. राहुल पाटील यांनी उपोषण स्थळी जाऊन उपोषण करते पालमकर बंधू यांची विचारपूस केली व सर्वतोपरी परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजाला मिळवून देण्यासाठी मदत करू असे आश्वासन यावेळी आ. राहुल पाटील यांनी दिले.


