राजेंद्र पोटफोडे
ग्रामीण प्रतिनिधि,अमरापुर
अमरापूर: मंगळवार दि.१७रोजी अमरापूर माध्य.व उच्च माध्य. विद्यालय येथे पंचायत समिती शेवगाव शिक्षण विभाग शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम.शैलजा राऊळ,विषय तज्ञ त्रिंबक फपाळ,देविदास खडके यांनी भेट देऊन विद्यालयाची पाहणी केली. विद्यालयाची सुरुवात परिपाठा ने झाली.यावेळी उत्कृष्ठ परिपाठाचे कौतुक करत विद्यालयाच्या परिसर,वर्ग खोल्या, संगणक विभाग,शिष्यवृती मार्गदर्शन वर्गाला भेट दिली असता समाधान व्यक्त करत फपाळ सर व खडके सर यांनी शिष्यवृती परीक्षेबाबत मार्गदर्शन केले,विविध लाभाच्या शिष्यवृती संदर्भात माहिती दिली.प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत आहारा विषयी माहिती घेतली. अशोक तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ना.शास्र विषयांतर्गत इयत्ता सातवी वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवून मतदानाचा अनुभव घेतला.या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता विदयार्थ्यांनी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी,कर्मचारी, उमेदवार,प्रतिनिधी इतर अधिकारी यांच्या भूमिका बजावल्या या उपक्रमाचे कौतुक करुन मार्गदर्शन केले.यावेळी प्राचार्य शेलार जी.के. काकडे एस.एस,अशोक जाधव,ज्ञानेश्वर आवारे,श्रीम.नांगरे यू.एस.श्रीम.करपे जी.एस. इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.


