मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे: चांदूर रेल्वे शहर व तालुक्यात रविवारी नवदुर्गा उत्सवाला मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली. शहरातील आझाद, सार्वजनिक नगर व आदर्श नवदुर्गा देवी मंडळांच्या पंडालमध्ये हर्षोल्लासत मातेचे आगमन झाले.यावेळी भाविकांनी पूजा,अर्चना व आरती करून दुर्गा मातेच्यामूर्तीचीप्रतिष्ठापना व घटस्थापना करताना ढोलताशांच्या गजरात अबीर गुलाल उधळला त्याचबरोबर प्रत्येक घरात कलश ठेवून घटस्थापना पूर्ण विधी आणि उत्साहात करण्यात आली. यामध्ये ग्रामीण भागात 24 नवदुर्गोत्सव मंडळे व शहरात 10 नवदुर्गोत्सव मंडळे असून शहर व ग्रामीणमध्ये एकूण 10 शारदा देवी मंडळे आहे या नवरात्री उत्सवालामुळे तहसील तसेच शहरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे 10दिवसांचा नवरात्रोत्सव. दुर्गा उत्सवादरम्यान शांतता राखण्यासाठी पोलीस विभागाकडून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आझाद नवदुर्गा मंडळात गरबा व महिला भक्तांसाठी लक्की ड्राॅ. नवदुर्गा उत्सवात महिला गरब्याचा आनंद घेतात. या मंडळात आरतीनंतर महिला गरबा खेळतात.येथे माँ दुर्गेच्या आरतीला उपस्थित महिला भक्तांना लकी ड्रॉद्वारे साडी भेट म्हणून दिली जाते.या मंडळातील कार्यकर्ते नवदुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.नगर नवदुर्गा मंडळातील नेत्रदिपक रोषणाई भाविकांना आकर्षित करते. शहरातील मध्य चौकात नगर नवदुर्गा मंडळाच्या वतीने देवीची स्थापना करण्यात येत आहे. या मंडळात नेत्रदीपक आणि झगमगाट रोषणाईमुळे भाविकांचे लक्ष वेधले जाते.येथे माँ दुर्गेच्या आरतीच्या वेळी उपस्थित महिला व मंडळाच्या सदस्या ढोल,मंजिराच्या नांदात आरतीचा आनंद घेतात.
सार्वजनिक आणि आदर्श नवदुर्गा उत्सवात भाविकांची गर्दी जुना सरकारी दवाखान्याजवळ सार्वजनिक नवदुर्गोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी सुंदर मंडप सजवून देवीची स्थापना केली जाते.आदर्श नवदुर्गोत्सव मंडळाच्या वतीने समाज मंदिरात माँ जगदंबेची घटस्थापना सुंदर देखाव्यासह करण्यात येते.या नवरात्रोत्सवात नवदुर्गा देवीच्या दर्शनासाठी शहरात भाविकांची गर्दी असते.