सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव: आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रयत्नातून हिसवळ खुर्द व वेहळगाव या गावासाठी केंद्र सरकारच्या
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या कडून मंजूर करून घेतलेल्या प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दिनांक १९ ऑक्टोबर रोजी हिसवळ खुर्द व वेहळगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे सायंकाळी चार वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, ना.देवेंद्रजी फडणवीस,ना. मंगल प्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, नांदगाव तालुक्यात आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नाने ग्रामीण भागात पहिल्यांदाच अशा प्रकारचे दोन सेंटर तीन वर्षासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे अठरा वर्षे वयोगटाच्या पुढील बेरोजगार मुलांसाठी मोफत प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाणार आहे. सोलर टेक्निशियन चा अभ्यासक्रम या ठिकाणी मोफत उपलब्ध करण्यात आलेला आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी सुद्धा या केंद्रमार्फत आपल्याला उपलब्ध होणार आहेत त्यासाठी तालुक्यात हिसवळ खुर्द व वेहळगाव असे दोन सेंटर निवडली आहेत. तालुक्यातील 80ते 90 गावातील तरुणांना या प्रशिक्षण केंद्राचा फायदा होणार आहे. सदरचे प्रशिक्षण केंद्र हे परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे


