भारत भालेराव
तालुका प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव-विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात आम्ही शिक्षक शाळेत त्यांचे पालक म्हणून भूमिका जबाबदारीने बजावत आहोत. फक्त यासाठी पालकांनी सहकार्य केले तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी मदत होते.आपल्या पाल्यांना मोबाईल पासून दूर ठेवा त्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी शिक्षकांशी चर्चा करा आणि शाळेच्या आवारात फिरणाऱ्या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी शाळेने घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा द्या असे आवाहन श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे यांनी विद्यालयात आयोजित शिक्षक-पालक मेळाव्यात मनोगतातून व्यक्त केले.श्रीराम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी शिक्षक-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर पालकांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील जायभाये यांनी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयाने राबवलेल्या आणि यापुढे राबवले जाणारे उपक्रम याविषयी माहिती दिली.पालक प्रतिनिधी वृद्धेश्वर अर्बनचे चेअरमन महादेव पाटेकर यांनी तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकरजी केदार यांनी विद्यार्थ्यांचे हित आणि विकास यासाठी शाळेने आखलेले उपक्रम आणि शाळेत घेतले जाणारे निर्णय यासाठी पालक म्हणून आम्ही शाळेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे मत मांडले. यावेळी सुरज पवार व अमोल नाकाडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे,पर्यवेक्षक सुनील जायभाये,वृद्धेश्वर अर्बनचे चेअरमन महादेव पाटेकर,मधुकर केदार, देविदास पाटेकर,देविदास गिर्हे, संजय बकाल,बाळासाहेब लबडे, कैलास पाटेकर,बापू भालसिंग, संजय पालवे,बाळासाहेब खोसे,दिनकर खोसे,कमलाकर गरड, यांचेसह पालक,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भालसिंग यांनी केले व सुधाकर आल्हाट यांनी आभार मानले.