रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
नागपूर ते पुणे आणि पुणे ते नागपूर रेल्वे हमसफर गाडीला जास्तीचे पाच डबे जोडण्यात आले. मनसे जनहित कक्ष व विधी विभागाच्या वतीने अकोला रेल्वे स्टेशन मास्तर कवळे साहेब प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर अकोला यांना विदर्भातील अनेक विद्यार्थी आणि नौकर वर्ग पुणे येथे राहतो.अकोला रेल्वे परिसरातील एकंदरी त तीन ते चार हजार रेल्वे प्रवासी वर्ग हा खाजगी बसेस ने प्रत्येक दिवसाला येणे जाणे करतात आणि सणासुदी च्या काळात तर खाजगी बसेस दुप्पट तिप्पट पटीने भाडे वसूल करतात त्यामूळे अकोला पुणे सुपर फास्ट एक्स्प्रेस सुरू करावी असे निवेदन दिले होते पण एवढया लवकर शक्य नसल्यामुळे पर्याय म्हणून नागपूर ते पुणे आणि पुणे ते नागपूर येथील रेल्वे प्रवासी यांना तात्पुरता दिलासा देण्या साठी पाच जास्तीचे डबे जोडण्यात आले आहेत त्यामुळे अकोला परिसरा तील पुणे येथे नौकरी करणारे चे नातेवाईक खुश झाला आहे आणि त्यांनी आनंद व्यक्त केले आहे. मनसे से सरचिटणस ऍड नंदकिशोर शेळके यांनी दिलेल्या निवेदनाला यश आले आहे. असे ऍड. शेळके यांनी सांगितले आहे .. यापुढे आपण सुद्धा अकोला ते पुणे आणि पुणे ते अकोला सुपर फास्ट एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यात यावी अशी मागणी आम्ही जनहितार्थ रेटून धरू अशी मागणी केली आहे,असे प्रतिनिधी सोबत चर्चा करतांना सांगितली. अखेर मनसेच्या मागणीला यश नागपूर ते पुणे आणि पुणे ते नागपूर रेल्वे गाडीला जास्तीचे पाच कोच जोडले, ऍड नंदकिशोर शेळके राज्य सरचिटणीस मनसे जनहित कक्ष व विधी विभाग महाराष्ट्र राज्य.