शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : उमरी ता.परभणी येथे काही समाजकंटकांनी मा. मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी अक्षेपार्ह घोषणाबाजी दिल्याने त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला त्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी आज दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष छगन शेरे यांनी तात्काळ तिथे जाऊन संबंधित पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन तात्काळ आरोपीची अटकेची कार्यवाही करून आरोपींना अटक करण्याची आग्रही मागणी केली. पोलीस प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कार्यवाई करत चार आरोपीवर भा.द.वी. ५०४, व ३४ अंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीना तात्काळ अटक केली. याप्रसंगी सकल मराठा समाजाच्या वतीने छगन शेरे, गोविंद घांडगे, नितीन देशमुख, सुधाकर रोकडे,अप्पूशेठ सोळंके,गजानन बारहात्ते, विशाल देशमुख आदींची उपस्थिती होती.











