परवेज खान
शहर प्रतिनिधी पांढरकवडा
पांढरकवडा:
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ . एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो . या निमित्याने नगर परिषद पांढरकवडा मार्फत स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियान ४.० , मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३ अंतर्गत दि . १२ ऑक्टोंबर २०२३ रोजी शालेय विद्यार्थ्याकरिता चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा व करिअर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते . सदर स्पर्धा शहरातील स्वच्छता आव्हाने व उपाययोजना पर्यावरण रक्षण तथा वृक्ष संवर्धन या विषयावर घेण्यात आल्यात . या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदविला सदर स्पर्धेचे परीक्षण श्री अमोल सुरवसे व श्री दीपक सिंगेवार सर यांनी केले सदर स्पर्धा ही तीन गटामध्ये घेण्यात आली . प्रत्येक गटात प्रथम , द्वितीय व तृतीय पारितोषिक वितरित करण्यात आले . त्याच प्रमाणे प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला भेटवस्तू देवून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला बक्षीस वितरण समारंभ वाचन प्रेरणा दिनी दि . १५ ऑक्टोंबर २०२३ रोजी शहिद नागेश्वर जिड्डेवार न . प . सभागृह येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला . तसेच यावेळी न . प . पांढरकवडा मार्फत संचालित क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले अभ्यासिका येथील यशस्वी विद्यार्थी डॉ . प्रज्वल मून , डॉ . ईश्वर तुपट , डॉ . युवराज सिंग पकाल , डॉ . अमर अगामे , श्री . हेमंत वानखेडे , श्री . अभिजीत मंगाम , श्री निलेश कांबळे श्री . राहुल चांदेकर , श्री . सुमित सोयाम , श्री . अविनाश मेश्राम श्री . जय मोहुर्ले सत्कार मान्यवरांचा हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना न प मुख्याधिकारी राजु मोट्टमवार यांनी विद्यार्थ्याना नियमित वाचनाचे महत्व पटवून दिले . तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ . अजितसिंग चहाल संचालक शारदा ज्ञानपीठ यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले . यावेळी माजी नगरसेवक श्री . साजिद शरीफ , जेष्ठ पत्रकार श्री नरेश मानकर , प्राध्यापक डॉ . रमजान विराणी , प्राध्यापक डॉ . प्रदीप झिळपीलवार सर , पत्रकार श्री रवी दर्शनवार यांची प्रमुख उपस्थिती होती . या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री . प्रमोद पुंगूरवार सर यांनी केले तर श्रीमती राधिका आयलेनीवार यांनी आभार प्रदर्शन केले . सदर कार्यक्रमाकरिता शिक्षण विभाग प्रशासकीय अधिकारी श्री . विकास आकुलवार , सभा अधीक्षक श्री . विनोद अंबाडकर , शिक्षण विभाग लिपिक श्री . मोहन उय्यलवार तसेच न . प . शिक्षकवृंद अधिकारी , कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .











