शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
परभणी : दि.16 शिवसेनेचे स्थानिक खासदार संजय जाधव यांची शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्षाच्या उपनेतेपदी निवड करीत पक्षनिष्ठेचे फळ देतेवेळी सुखद असा धक्का दिला आहे.
संजय जाधव हे राजकीय क्षेत्रातील पदार्पणापासूनच शिवसेनेचे एक निष्ठावान कार्यकर्ते आहेत. राजेसंभाजी मित्र मंडळाच्या माध्यमातून जाधव यांनी सामाजिक क्षेत्रात भक्कम असा पाया रोवला. पाठोपाठ हिंदुर्हदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयीच्या प्रचंड आस्था व हिंदुत्व विषयीच्या प्रेमापोटी शिवसेनेत प्रवेश करीत भगवा झेंडा खांद्यावर घेतला, तेव्हापासूनच संघर्षशील असा कार्यकर्ता म्हणून ओळख असणार्या जाधव यांनी कधीही मागे पाहिले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगर, सभापतीपद भूषविल्या पाठोपाठ सार्वजनिक निवडणूकांमधुनसुध्दा एका पाठोपाठ एक यश पटकावून जाधव यांनी महाराष्ट्र विधानसभा व लोकसभेचे दोनवेळा प्रतिनिधीत्व केले. ते सुध्दा प्रखर हिंदुत्ववादी मतांच्या बळावरच. शिवसेनेंतर्गत गटबाजी व दुफळीच्या घडा मोडींच्या पार्श्वभूमीवर जाधव हे सातत्याने त्यापासून कोसोदूर राहीले. राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनें अन्तर्गत आमदार व बहुतांशी खासदारांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठ फिरविली तेव्हा खासदार जाधव यांनी ठाकरे यांची साथ न सोडण्याचा संकल्प जाहीर केला. त्या प्रमाणे ठाकरे कुटूंबा विषयीच्या आस्था व प्रचंड असे प्रेम व निष्ठेपोटीच जाधव यांनी प्रचंड दडपणे असतांनासुध्दा शिवसेनेबरोबर, ठाकरे कुटूंबियांबरोबर गद्दारी न करण्याचा संकल्प सोडला. वास्तविकतः या जिल्ह्यात माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी खासदार सुरेश जाधव, माजी खासदार अॅड.गणेशराव दुधगावकर, माजी आमदार हरिभाऊ लहाणे, माजी आमदार माणिकराव आंबेगावकर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी शिवसेना, ठाकरे गटाबरोबर पध्दतशीर पणे गद्दारी करीत सोयीनुसार आपआपले मार्ग स्विकारले. परंतु, खासदार जााधव यांनी यावेळीच्याही अभूतपुर्व राजकीय स्थितीत ठाकरे कुटूंबियां विषयीच्या आस्थेपोटी आपली निष्ठा दाखवून दिली.तेव्हापासुनच ठाकरे कुटूंबिय हे जाधव यांच्या या निष्ठेबद्दल सातत्याने प्रेम व्यक्त करत आले आहेत. या निष्ठेपोटीचे च द्योतक म्हणजेच शिवसेने अंतर्गत संघटनात्मक बांधणीत ठाकरे कुटूंबियांनी खासदार जाधव यांची शिवसेनेचे उपनेते म्हणून नियुक्ती करीत सुखद असा धक्का दिला आहे.