मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
केलेल्या मैत्रीमुळे आयुष्याचा मार्ग सुकर होतो कारण आयुष्यात एकदा दिशा चुकली की आपली दशा होण्यास वेळ लागत नाही. आपल्याला मोठी स्वप्न पहायला हवीत वाचन चळवळ रुजवण्यासाठी प्रत्येकाने वाचनालयातील ग्रंथालयाचा वापर करावा असे प्रतिपादन श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे यांनी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्त साधून केले.
श्रीराम विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची ९२ वी जयंती निमित्त ‘वाचनप्रेरणा दिन’म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुढारी वृत्तपत्र समूहाच्या वतीने विद्यालयात वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करताना वक्तृत्व आणि निंबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना दैनिक पुढारीचे ढोरजळगावचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर फसले यांनी स्पर्धा आयोजनाबाबत माहिती देत पुस्तक वाचनाचे फायदे आणि वाचनाचे महत्व विषद केले.
विद्यालयाचे शिक्षक अमोल भालसिंग यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी म्हणून ज्ञान ग्रहण करण्याची प्रचंड क्षमता विद्यार्थ्यांत असते म्हणून क्रमिक पुस्तकाबरोबर अवांतर वाचनाला महत्व द्या जेणेकरून ज्ञानात भर पडेल याबरोबरच सामान्य कुटुंबातील मुलगा ते भारत देशातील लोकांचे राष्ट्रपती असा डॉ.कलमांचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थी वाकडे हर्षदा,फसले श्रेया,अकोलकर शर्वरी,नागरगोजे रामेश्वर,बकाल स्वाती,देशमुख सृष्टी, कराड समीक्षा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्रचार्य संजय चेमटे,पर्यवेक्षक सुनील जायभाये,जेष्ठ शिक्षक सुधाकर आल्हाट यांचेसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन पूनम वाबळे यांनी तर विनोद फलके यांनी उपस्थितांचे आभार मानले.,..











