रितेश टीलवत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
लोकजागर मंच चे संस्थापक अध्यक्ष मा. अनिल दादा गावंडे यांच्या संकल्पनेतून तेल्हारा शहर मधील वर्ग 5 ते 12 च्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले आहे विध्यार्थ्यांनी शोध कवृत्तीने स्वतःचे ज्ञान वर्धनकरावे या हेतूने सदर परीक्षेचे आयोजन केले आहे. यामध्ये बुद्धिमत्ता, गणित,मराठी,इंग्रजी,सामान्य ज्ञान,चालू घडामोडी, विज्ञान, इतिहास,संत महापुरुष त्यांचे चरित्र इत्यादी आधारित प्रश्नांचा समावेश असेल पेपरमध्ये एकूण 50 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे एकूण 100 गुणांनाचा पेपर असेल हा पेपर विद्यार्थ्यांना 3 दिवसां करिता घरी सोडवण्या साठी दिल्या जाईल सहभागी सर्व विद्यार्थ्यां मधून गुणांनुक्रमे प्रथम 10 क्रमांक निवडण्यात येतील त्यांना रोख बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल प्रत्येक शाळेमधून प्रथम येणाऱ्या विध्यार्थ्या ला प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येईल व सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.