सुनिल गेडाम
तालुका प्रतिनिधी सिंदेवाही
सिंदेवाही : सध्या वन विभागातर्फे वन्य जीव सप्ताह सुरु असताना वन विभागात खळबळ जनक दुर्दैवी घटना घडली आहे,वृत्त पुढील प्रमाणे सिंदेवाही वन परीक्षेत्र मधील नियतक्षेत्र लोणखैरी कक्ष क्रमांक 247 आर एफ च्या सीमेवर मौजा चिटकी गावाला लागून असलेल्या अतिक्रमन असलेल्या शेत शिवाराच्या बांध्यावर हत्ती मृत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली, शोशल माध्यमाद्वारे ही माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली त्या मुळे या हत्ती ला बघण्यासाठी गावातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली,नागरिकांची होत असलेली गर्दी बघता पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा घटनास्थळी पाचरण करण्यात आले, नेमका हत्तीचा मृत्यू कश्यामुळे झाला याचे तर्कवितर्क नागरिकात सुरु झाले आणी गावातील नागरिक सदर हत्ती हा विद्युत करंट मुळे मृत्यू पावला अशी चर्चा करीत होते,कारण मृत पावलेल्या हत्तीच्या सोंडेवर जळल्याचे व्रण दिसत होते, सदर हत्ती हा आपल्या कळपा पासून भरकटला असल्याने सिंदेवाही जंगलव्याप्त परिसरात मागील सहा महिन्यापासून फिरत होता, वन विभागाच्या माहिती नुसार या हत्ती ने आज पर्यंत फिरत असतांना कोणतेही
मोठे नुकसान केले नव्हते, हा हत्ती जंगलव्याप्त गावातील शेतकऱ्यांना दर्शन देत होता,त्यामुळे हा हत्ती तालुक्यात चर्चेचा विषय सुद्धा बनला होता,या हत्ती विषयी बातम्या प्रसार माध्यमद्वारे प्रसारित देखील होत होत्या,या हत्ती मुळे कोणतीही मानवी जीवितहानी होऊ नये म्हणून वन विभाग या हत्तीवर नजर ठेऊन होते,पण दुर्दैवाने हा हत्ती जंगलव्याप्त परिसरात फिरत असतांना मौजा चिटकी या गावातील जंगल परिसरात शिरकावं केला, आणी चिटकी गावातील अतिक्रण धारक शेतकरी अशोक पांडुरग बोरकर यांनी आपल्या शेतातील पिकाचे वन्य प्राण्यापासून संरक्षणासाठी शेताच्या बांध्यावर विद्युत करंट लावला, आणी याचं विद्युत करंट मुळे हा हत्ती जाग्यावरच मृत्यूमुखी पडला,झालेली घटना गंभीर स्वरूपाची असल्याने डॉ जितेंद्र रामगावकर मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनवृत्त, दीपेश मलोहोत्रा उप वनसंरक्षक आपल्या टीम समवेत घटना स्थळी हजर झाले,हत्तीच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी हत्तीचे घटनास्थळीच पोस्टमार्टम करण्यात आले आणी डॉ नी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार हत्तीचा मृत्यू हा विद्युत करंट ने झाला असे सांगितले त्या नुसार अशोक पांडुरंग बोरकर वय वर्ष 65 व अजय अशोक बोरकर वय वर्ष 29 यांना ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पी.ओ.आर.क्र 09130/228231 अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला आरोपीची सखोल चौकशी सुरु आहे व सदर प्रकरणाचा तपास एम बी चोपडे सहाय्य्क वनरक्षक (प्रादे व वन्य जीव) ब्रम्हपुरी वन विभाग हे करीत आहे.
सिंदेवाही वन परीक्षेत्राच्या हद्दी मध्ये विद्युत करंट मुळे हत्ती चा झालेला मृत्यू ही खूपच दुर्दवी घटना असून वैद्यकीय प्राथमिक अहवालनुसार सदर आरोपीला ताब्यात घेतले असून अश्या दुर्दवी घटना पुढे घडणार नाही या साठी शेतकऱ्या मध्ये जनजागृती सुद्धा करू व झालेल्या घटनेत आरोपीला कठोर शिक्षा होईल असे आश्वासन देतो जेणे करून या पुढे शेती मध्ये अशे विद्युत करंट कुणी लावणार नाही, शेतात लावलेल्या विद्युत करंट मुळे मानवी जीवित हानी सुद्धा होते त्या मुळे अश्या व्यक्तींना कठोरात कठोर शासन होईल या साठी प्रयत्न करू : श्री डॉ जितेंद्र रामगावकर मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनवृत्त