अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड तालुक्यातील बाळदी गावात जिल्हा परिषद शाळेत काही शिक्षकांचा निरोप समारंभ कार्यक्रम करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रभाकर राठोड उपस्थित होते.आज झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक धात्रक सर, तांडा वस्तीतील मुख्याध्यापक नीलमवार सर, दरने सर, जोशी सर, गोविंदवार मॅडम, पटले सर,या सर्व शिक्षकांनी अतिशय चांगल कार्य केले. त्याबद्दल नीता मॅडम,गायकवाड सर,पाटील सर, भोस्कर सर यांनी सर्वांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी बदली झालेल्या सर्व शिक्षकांनी आपले आत्तापर्यंत आलेले अनुभव अनुभवातील शाळा व तेथील विद्यार्थी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यासमोर केले व आम्ही सर्व तुमच्या सदैव सोबत आहोत असा संदेश दिला. तसेच काही शिक्षकांनी विद्यार्थी कसा असावा शाळेमध्ये कधी कधी पालक सभा का घ्याव्या व पालकांनी विद्यार्थ्यावर कशाप्रकारे आपले लक्ष ठेवावे आपल्या गावातील शाळेवर लोकांनी कशाप्रकारे लक्ष ठेवलं पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती आपल्या शब्दातून त्यांना दिली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिट्टेवार सर व आभार प्रदर्शन पाटील सर यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे आतिश वटाणे, नरवाडे ताई,शंकर चिरडे व सर्व नवनिर्मित शिक्षक व शाळेतील शिक्षक सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


