सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचे पडसाद बीड जिल्ह्यात उमटल्याने दि. २ सप्टेंबर २०२३ शनिवार रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा आरक्षणचा प्रश्न प्रलंबित असल्याने महाराष्ट्र. राज्य सरकारने या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे मराठा समाजाचे मत येत आहे. जालना जिल्ह्यातील शहागड येथे मराठा आक्रोश आंदोलन झाले या आंदोलनात मराठा समाज लाखोंच्या संख्येने उपस्थित होता जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अंतरवाली या ठिकाणी चालू असणाऱ्या आमरण उपोषणाला महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाने पाठिंबा देत आंदोलनात शामील होण्यासाठी आंदोलनस्थळी हजेरी लावत मोठ्या संख्येने उपस्थित झाले असता दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी पोलिस प्रशासनाने आंदोलकांवर आश्रु धुरांच्या कांड्या फोडत अमानुषपणे लाठीचार्ज केला. या घटनेचे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पडसाद उमटले बीड जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यांनी या आंदोलनास पाठींबा देत आंदोलकांवर पोलिस प्रशासनाकडून झालेल्या अमानुष लाठीचार्ज विरोधात बीड जिल्हा बंदची हाक दिली. बंदच्या हाकेला प्रतिसाद देत परळी वैजनाथ तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी यांनी परळी वैजनाथ शहर दि. २ सप्टेंबर २०२३ रोजी बंद ठेवले तर परळी वैजनाथ तालुक्यातील मोहा याठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेवर दगडफेक करण्यात आली. या घटनेमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसचे नुकसान झाले असून या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परळी शहर पोलिस प्रशासनाने मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यांना शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी शासकीय मालमत्तेचे किंवा खाजगी मालमत्तेचे नुकसान होऊ नये याची काळजी घेत बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण पोलिस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.











