पातूर : पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन कार्यक्रम पातूर तालुका महिला आघाडी तर्फे साजरा करण्यात आला.रक्षाबंधन हा बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असणारा पवित्र सण आहे. या दिवशी बहीण भावला राखी बांधून आपले रक्षण करण्यासाठी साकडे घालते.२४ तास कर्तव्य पार पडणारे आमचे पोलीस बांधव आपली ड्युटी बजावत असतात.पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. किशोर शेळके, उपनिरीक्षक मा.गजानन तडसे, यांच्या उपस्थित पोलीस कॉन्स्टेबल, होमगार्ड कर्मचारी तसेच कार्यरत पोलीस अधिकारी व पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणी बद्दल विचारपूस केली.तसेच विविध विषयावर चर्चा करण्यात आली.महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रवी वैद्य यांनी शासन दरबारी केलेल्या सतत प्रयत्नामूळे पोलीस भरतीमध्ये पोलीसांच्या पाल्यांना पाच टक्के आरक्षण मिळाले पोलीसांच्या न्याय, हक्कासाठी झटणारी व सामान्य जनतेच्या प्रश्नांवर लढा देणारी महाराष्ट्रातील ही एकमेव संघटना आहे.यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन पातूर तालुका अध्यक्ष अविनाश पोहरे,युवती सदस्य कु.सुवर्णा चव्हाण, कु.गायत्री शेवलकार, कु. कोमल सुरवाडे, कु. दिव्या वगरे, पवन सुरवाडे,आशिष शेगोकार आदी उपस्थित होते.


