सोपान सासवडे
ग्रामीण प्रतिनिधी अहमदनगर
अहमदनगर : आत्मा कृषी विभाग अंतर्गत आज दि.24 तालुका कृषी कार्यालय नगर मार्फत कृषी चिकित्सालय अहमदनगर येथे रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला होता. नामशेष होत चाललेल्या विविध रानभाज्या व त्यांचे संवर्धन, तसेच मानवी आहारात विविध औषधी गुणधर्म असलेल्या रान भाज्यांचे महत्त्व यासंदर्भात हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आत्म्याचे प्रकल्प उपसंचालक श्री राजाराम गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी श्री पोपटराव नवले, तालुका कृषी अधिकारी श्री सिद्धार्थ क्षीरसागर, जिल्हा परिषद कृषी कार्यालयाच्या क्रांती चौधरी यांनी रानभाज्याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी आत्म्याचे सहाय्यक तंत्र व्यवस्थापक श्री श्रीकांत जावळे, श्री उमेश डोईफोडे तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व तालुक्यातील शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते.


