शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
परभणी : दि.24 विधीमंडळाच्या विशेषाधिकार (हक्कभंग) समितीवर आमदार बाबाजानी दुर्राणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदे च्या विशेषाधिकारी समितीच्या सदस्यांची गुरुवारी नावे जाहीर करण्यात आली. या समितीत राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे आमदार अब्दुल्लाह खान दुर्राणी यांच्यासह प्रवीण पोटे, सुरेश धस, गोपीचंद पडळकर, अॅड. अनिल परब, विलास पोतनीस, शशीकांत शिंदे, अशोक जगताप, अभिजित वंजारी, कपील पाटील, विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून राजेश राठोड यांचा समावेश असून समिती प्रमुख म्हणून प्रसाद लाड हे काम पाहणार आहेत. आमदारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याकरीता ही समिती कार्यरत आहे. सभागृह, समित्या व सदस्य यांच्या विशेषाधिकाराचा भंग झाल्यास या समितीमार्फत दखल घेतल्या जाते.