रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तालुका कृषी अधिकारी कार्यालय तेल्हारा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापनयंत्रणा आत्मा यांच्या वतीने कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभाग नवी दिल्ली व आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजना व प्रधानमंत्री सुष्मअन्न प्रक्रिया उद्योगाचे उन्नयन योजनेअंतर्गत कृषी खाद्य उद्योग उभारण्यास इच्छुक प्राथमिक कृषी पतसंस्था,विपणन सह कारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयं सहायता गट,संयुक्त उत्तरदायित्व गट, बहु उद्देशीय सहकारी संस्था तसेच कृषी उद्योजक स्टार्टअप अन्य आणि केंद्र राज्य संस्था किंवास्थानिक संस्था पुरस्कृत सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प यांच्या करता एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री शंकर किरवे व प्रकल्प संचालक आत्मा डॉ. मुरली इंगळे यांच्या मार्गदर्शनात श्रीकृष्ण मंदिर सभागृह गाळेगाव येथे केले होते.याकार्यक्रमा चे प्रमुख मार्गदर्शक राहुल ठाकरे पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ विभागीय अंमलबजावणी कक्ष अमरावती यांनी पी एम एफ एम ई योजनेचे विस्तृत असे मार्गदर्शन उपस्थित माविम, उमेद अभियान अंतर्गत महिला बचत गट सदस्यांना व उपस्थित सर्व शेतकऱ्यांना केले. यामध्ये योजने अंतर्गत समाविष्ट विविध उद्योग त्यासाठी आवश्यक असणारी पायाभूतसुविधा, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पद्धती याबद्दल माहिती दिली. कृषी पायाभूत सुविधा याच्याबद्दल उपस्थित सर्व शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक तसेच उपस्थित शेतकरी यांना विवेक जंजाळ यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेमध्ये नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीराम वाघमारे यांनी नाबार्डच्या विविध योजना,कृषी संलग्न योजना याबद्दल सविस्तर असे माहिती दिली. सदर कार्यशाळेला तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी प्रास्ताविका मध्ये तालुक्यामध्ये कृषी आधारित उद्योगाची असलेली आवश्यकता, कार्यशाळा आयोजन करण्यामागची पार्श्वभूमी विषद केली तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजने चा लाभ घ्यावा यासाठी आवाहन केले. सदर कार्यशाळेला माविम व उमेद अभियानाचे प्रवीण चोंडके, तायवाडे, डी आर पी वृषाली गाडे, निखिल निचळ, कृ प नागे, ढोलेकर, बळी,कोरडे,व सर्व कृषि सहाय्यक, समूह सहाय्यक, महिला बचत गट, प्रगतीशील शेतकरी, बँक शाखा व्यवस्थापक यांची उपस्थिती होती कार्यशाळेचे सूत्रसंचालन खंडागळे यांनी तर आभार प्रदर्शन रवींद्र माळी यांनी केले. कार्यक्रम संयोजक म्हणून आत्मा तालुका व्यवस्थापक दीपक मोगरे यांनी कार्य केले.