अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, तलासरी
दि.23 ऑगस्ट पालघर जिल्हा हा उत्तर कोकण पत्ता आहे त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात डोंगर – दऱ्या आणि सपाट जमीन मोठ्या प्रमाणात आढळते त्यामुळे या जिल्हा मध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि पूर्ण जिल्यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी असल्याचे दिसून येतात,त्यामुळे नुकतेच्या काही दिवसा आधी राज्याचे लोकप्रिय मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेल्या पी.एम. किसान सन्मान निधी ही योजना पालघर जिल्हातील शेतकऱ्यांना घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे, कारण हे आधी ऑफलाईन असल्यामुळे सहज पी. एम. किसान सन्मान निधी चे Kyc करत येत होते मात्र आता Online PM Kisan Sanman Nidhi चे Kyc करावे लागत असल्यामुळे अशिक्षित शेतकऱ्यांरी गोधळून गेलेले आहेत त्याचं बरोबर सर्वात मोठी समस्या म्हणजे पालघर जिल्हा आधी ठाणे जिल्हा होता त्यामुळे आधी सर्व शेतकऱ्यांना PM KISAN SANMAN NIDHI चा लाभ भेटत होता, मात्र आता सर्व Online झाले आहे आणि जिल्हा हा बदलेला असल्यामुळे Online मध्ये Kyc करण्यासाठी आधार कार्ड वरती जिल्हा हा पालघर असला पाहिजे अशी अट आहे आणि आधी असलेल्या ठाणे जिल्हा मध्ये पालघर जिल्हा तयार झाल्यामुळे पालघर जिल्हातील गावे हे ऑनलाईन दाखवत नसल्यामुळे PM kisan Nidhi चे Kyc करायला खूप अडचणी येत आहेत, पी. एम. किसान सन्मान निधी चा जर Kyc करायचा असेल तर आपल्याकडे प्रोफ पाहिजे असतो मात्र पालघर मध्ये राहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडे जे प्रोफ आहे त्यामध्ये ठाणे जिल्हा असल्यामुळे आधार अपडेट करायला अडचण निर्माण होतं आहे,त्यामुळेच पालघर जिल्यातील खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी हे पी. एम.किसान सन्मान निधी पासुन वंचित आहेत.