बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड : बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे दौंड तालुक्याच्या गावभेट दौरा करत असताना त्या मलठण येथे बोलत होत्या.यावेळी त्या म्हणाल्या की भाजपाचे सरकार म्हणजे भ्रष्टाचारी जुमला सरकार आहे.या सरकार वरती पुन्हा विश्वासू ठेवु नका.या सरकारने फक्त घरे फोडायचे काम केलेले आहे. आणि महागाई वाढवलेली आहे.गॅस महाग केला,पेट्रोल, डिझेल महाग केले. टोमॅटोचे दर पाडले,कांदा निर्यातिची मागणी करून देखील कांदा निर्यात केला नाही.असे अनेक आरोप केले. नवाब मालिक देशद्रोही होतेे तर आता त्यांना भेटायला का गेला. आणि त्यांची केस मोहित कुंभोज यांनी माघारी का घेतली असा प्रश्न देखील उपस्थितकेला. मुख्यमंत्र्यांवर टिका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की शिंदेनी शिवसेनेचे चिन्ह चोरले, पक्षाचे नाव चोरले हे सरकार सर्वसामान्यांचे नसून हे सरकार ईडीचे सरकार आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संपूर्ण प्रॉपर्टी वरती ईडीने 109 वेळा धाडी टाकल्या एवढ्या वेळा येडीने व भाजपाच्या सरकारने देशमुख यांना नाहक त्रास दिला.अनिल देशमुख, नवाब मलिक, छगन भुजबळ यांना मी जेलमध्ये भेटायला गेले कारण आम्ही एकेकाळी एका ताटात जेवलो होतो. त्यांनी एकेकाळी पवार कुटुंबीयांना यांना साथ दिलेली आहे.म्हणून अजूनही काही नेते जरी विरोधात गेले तरी पवार कुटुंब त्यांना विरोध करणार नाही.सत्ता असो किंवा नसो पवार कुटुंब कधीही कोणालाही नाहक त्रास देत नाही खोट्या केसेस करण्याचे पाप पवार कुटुंब कधीही करत नाही.हे पाप फक्त भाजपाचे सरकार करत आहे.कितीही खोट्या केसेस केल्या आणि ईडीच्या दुरुपयोग करून धाडी टाकल्या तरी पवार कुटुंब असल्या दबावाला कधीही बळी पडणार नाही. व त्या म्हणाल्या की मणिपूर मधील नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे परंतु भाजपाचे सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. असा घणाघात शेवटी केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, माजी नगराध्यक्ष बादशाह शेख, सोहेल खान,माजी सभापती ताराबाई देवकाते, शिवसेनेचे शरद सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा जयश्रीताई भागवत,योगिनी दिवेकर, राष्ट्रवादी युवकचे सचिन काळभोर, माजी सरपपंच उज्वला रामभाऊ शेळके,रामभाऊ टुले,भाऊसाहेब देवकाते,लालाशेठ आमनर, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचालन नवनाथ थोरात यांनी केले तर आभार माऊली चव्हाण यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.