अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : नुकतेच प्रभात किड्स अकोला येथे आंतर शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या असून या स्पर्धेमध्ये वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातुर येथील दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून पातुर तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. वसंतराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातुर येथे वर्ग बारावी मध्ये शिकत असलेला ओम संजय गाडगे याने 19 वर्षे वय व 61 किलो वजन गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच वर्ग अकरावीत शिकत असलेला ओम राजु चौधरी याने सतरा वर्ष वय व 48 किलो वजन गट या कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.वसंतराव नाईक विद्यालयाचे हे दोन्ही स्पर्धक तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजय झाले असून त्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेकरिता पात्र झाले आहेत. या दोन्ही कुस्तीपटूंच्या नेत्रदीपक यशाबद्दल त्यांचे संस्थेचे संस्थापक/सचिव रामसिंग जाधव साहेबांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. या विजेता स्पर्धकांना विद्यालयाचे प्राचार्य एस.एम.सौंदळे व आपल्या क्रीडा शिक्षकाचे मार्गदर्शन लाभले.ओम संजय गाडगे व ओम राजु चौधरी या कुस्तीपटूंच्या कुस्ती स्पर्धेतील नेत्रदीपक यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.











