रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
लेट दिवालीबेन सेदाणी स्कूल येथे स्वतंत्रादिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष सुरेशजी सेदानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,यावेळी मंचावर अध्यक्षा स्मिता सेदाणी, किशोर सेदाणी , प्रमुख पाहुणे म्हणून अडव्होकेट विशाखा वासनिक मॅडम अडव्होकेट मंगेश सोनोने,विजय जितकर , प्राचार्य विजय भगवतकर यांची उपस्थिती होती. यावेळी चिमुकल्या विदयर्थी यांनी भाषणे दिली.तसेच देशभक्तीपर गीत ,नृत्य सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जागृती सेदानीव रक्षा राठी यांनी केले तर आभार प्रदर्शन शुक्रता नेमाडे यांनी केले. कार्यक्रमाला पालक विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याची उपस्थिती होती.