कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
आज दिनांक १८ऑगष्ट २०२३ ला वीज वितरण कंपनीच्या सोनाळा विज वितरण कंपनीच्या उपकेंद्र येथे सोनाळा येथील ग्रामस्थांनी कनिष्ठ अभियंता श्रीराम बोदडे यांना निवेदन दिले. सोनाळा गावठाण व शेतीचा विज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. एक तास सुध्दा वीजपुरवठा सुरळीत सुरू राहत नाहीं. शेतातील विद्युत वाहिनीवरील ट्री कटिंग झालेली नाहि त्यामुळे वेळोवेळी शॉक सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो, त्यासाठी तात्काळ विद्युत वाहिनीवरील ट्री कटिंग करण्यात यावे. तसेच दिवस भर विजेचा लपंडाव सुरू असतानाच त्यात आणखी भर म्हणून अतिरीक्त इमरजन्सी भारनियमन सुध्दा घेतल्या जाते, इमरजन्सी भारनियमन यानंतर सोनाळा येथे घेण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले.सोनाळा उप केंद्राचा भौगोलिक भाग खूप मोठा असूनही या उपकेंद्रात फक्त चारच वायरमन कार्यरत आहेत. आणि त्यामध्ये सुध्दा चार पैकी एकच वायरमन निवासी आहे. बाकी सर्व वायरमन संध्याकाळी पाच वाजता आपापल्या गावी निघून जातात परिणामी रात्री लाईन मध्ये बिघाड झाल्यास तासन् तास सर्व परिसरात लाईन बंद राहते. म्हणून सोनाळा उपकेंद्रात मनुष्यबळ वाढवणे व त्यांनां निवासी राहण्यासाठी निवेदन देण्यात आले. सदर निवेदन देताना सोनाळा येथील सरपंच श्री हर्षल खंडेलवाल भाजपा शहर अध्यक्ष श्री प्रकाश गोतमारे, भाजपा किसानआघाडी तालुका उपाध्यक्ष मोहन ठोकणे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रमेश खोकले, भाजपा कार्यकर्ता प्रमोदजी इंगळे, सामजिक कार्यकर्ता प्रतीकभाऊ वडोदे, युवा नेते करण अर्दळे, ग्राम पंचायत सदस्य अनंता पिंजरकार व सामाजिक कार्यकर्ता तसेच राष्ट्रीय गोरक्षा मंच बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्री सुधीर लव्हाळे, उपस्थीत होते.