प्रा.सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव : नाशिक जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक समाजाचे नांदगाव तालुका माजी संचालक व नांदगाव तालुक्याचे ज्येष्ठ नेते साहेबराव अण्णा आनंदा पाटील (भालूरकर) यांचे आज सकाळी ५.३३ वाजता म .वि.प्र संस्थेच्या नाशिक येथील रुग्णालयात निधन झाले .आज मविप्र संस्थेचा समाज दिन आहे आणि याच दिवशी मविप्रचे माजी संचालक असलेल्या साहेबराव अण्णांचे निधन झाले. संस्थेच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. विशेष करुन १९९७ ते २००२ या काळात ते नांदगाव तालुका संचालक असतांना तालुक्यातील संस्थेच्या शाखांचा विकास व शैक्षणिक. दर्जा सुधारण्यासाठी आण्णांनी विशेष परिश्रम घेतले होते. तसेच ते नांदगाव पंचायत समितीचे माजी अध्यक्ष होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते जुने निष्ठावान सहकारी म्हणून त्यांची एक ओळख होती त्यांनी नांदगाव तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील आणि सहकार क्षेत्रात दीर्घकाळ असे नेतृत्व केले त्यांच्या निधनामुळे नांदगाव तालुक्याची मोठी हानी झाली असून राजकीय आणि सामाजिक पटलावर भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे त्यांचा अंत्यविधी आज दुपारी तीन वाजता भालूर या त्यांच्या गावी होणार आहे.











