संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
दौंड तालुक्यातील रावणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज स्वतंत्र दिना निमित्त झेंडावंदन करणेत आले या वेळी आपल्या सर्व सहकारी व कर्मचारी वर्गाला डॉ. मोहन पांढरे यांनी तंभाखू मुक्ती ची शपथ दिली,डॉ.मोहन पांढरे यांनी तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ पासून होणारे दुष्परिणाम या बद्दल माहिती दिली आणि या पासून कसे दूर राहता येईल या बद्दल मार्गदर्शन केले.या वेळी झेंडावंदन डॉ.अपर्णा शिंदे यांचे हस्ते पार पडले. या प्रसंगी वरिष्ठ सहाय्यक नानासाहेब मारकड,कनिष्ठ सहायक दिलीप जगदाळे, बगाडे डी. आर., औषध निर्माण अधिकारी खराडे , लॅब टेक्निशियन श्रीमती छत्रिकर, आरोग्य सहायिका अनुराधा कुंभार, अप्पा धायतोंडे, आरोग्य सहायक रमेश पानसरे, हनुमंत आडसुळ, संगीता साळवे, सुप्रिया दळवी उपस्थित होते. या वेळी सूत्र संचालक डॉ. मोहन पांढरे यांनी केले आणि आभार श्री. हनुमंत आडसुळ यांनी मानले.