भागवत नांदणे
सर्कल प्रतिनिधी, वरवट
वरवट: दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्वतंत्र दिवशी (NMV) मित्र गृप म्हणजेच 1998 बॅच च्या वर्ग मित्रांनी एवढ्या धावपळीच्या जीवनात सुध्दा एकत्र येऊन आपल्या जुन्या मैत्री च्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या, आणि सर्वानुमते वर्गणी करून नागेश्वर महाराज विद्यालय वरवट बकाल येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, आणि आम्ही एकेकाळी या विद्यालयाचे विद्यार्थी होतो अशा आठवणी करून दिल्या, आज तेथे ते शिक्षक किंवा विद्यार्थी जरी नसले तरी त्यांचं प्रेम आणि आठवणी मात्र कायमच्या टिकून आहेत, आणि या आठवणीला तेवत ठेवणारे मैत्री च्या दुनियातिल बादशहा सर्वांचे लाडके गोड व्यक्ती महत्त्व अनिल रोठे यांच्या प्रयत्नातून शक्य होत आहे, दरवर्षी प्रमाणे प्रतिष्ठित नागरिकांकडून झेंडा ध्वजारोहण करण्यात आले, नंतर मित्र मंडळीने आपल्या आठवणी ताज्या करून नाष्टा करण्यात आला.या वेळी नागेश्वर महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक राजपूत सर, अस्वार सर, भुते सर, गिरी सर, पवार सर, ढगे सर, शालिग्राम दामदर, अमित गांधी, नारायण भुसारी, बंडु भास्कर,(NMV) मित्र गृप चे ॲडमिन, अनिल रोठे, दिनेश डाबरे, सुनिल डाबरे, वासुदेव घायल, अमोल बकाल, ओंकार टाकळकार, राजु दामदर, सुनिल ढगे, सदानंद गवांदे, संदिप माटे, आदी मित्र मंडळी उपस्थित होती.