वैभव गुजरकर
ग्रामीण प्रतिनिधी अकोट
सावरा :- गट ग्रामपंचायत तर्फे देशाचा ७६ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ग्रामवासी व ग्रामपंचायत सावरा रंभापुर च्या वतीने विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सर्वप्रथम जि.प शाळा येथून झेंडावंदन होऊन प्रभात फेरीची सुरुवात झाली. महारुद्र हायस्कूल मध्ये झेंडावंदन होऊन सर्व विद्यार्थी महात्मा गांधी चौक येथे उपस्थित झाले येथे ग्रामपंचायत सदस्य कैलास टोलमारे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. सुभाष चौक येथे मानवंदना देण्यात आली गावातील मुख्य रस्त्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ एकत्र येऊन या ठिकाणी पूजन व राष्ट्रगीत गाऊन श्री संत गाडगेबाबा स्मारकाजवळ उपसरपंच धिरज गीते याच्या हस्ते पूजन करण्यात आले राष्ट्रगीत होऊन. जि. प उर्दू शाळा येथे राष्ट्रगीत व झेंडावंदन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ ध्वज वंदना व राष्ट्रगीत गाण्यात आले. गावातील मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम ग्रामपंचायत भावनांमध्ये सरपंच स्वाती योगराज मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शहीद स्मारक प्रतिकृतीचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले यावेळी प. सं माजी उपसभापती वैशाली प्रकाश राऊत ग्रामपंचायत सदस्य स्वाती वैभव गुजरकर, सीमा सुनील सपकाळ, सीमा धम्मपाल धांडे, शितल उमेश धांडे कैलास टोलमारे, डीगंबर सपकाळ, संजय सोनोने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होऊन माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. गावातील३० माजी सैनिकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शानदार सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सैनिक श्रीकृष्ण टोलमारे,रामेश्वर काळे, मनोहर गवारगुरु, वसंत टोलमारे, डीगंबर सपकाळ,प्रकाश धाडे, राजेंद्र सपकाळ, केशवराव जवंजाळ, हरिभाऊ सोनोने मदन बोडे, रामभाऊ धांडे सारीपुत्र धांडे, रामभाऊ जवंजाळ, प्रदीप काळे, सुरेश सोनखास्कर, विलास टोलमारे,तर दिवंगत सैनिक भाऊराव टोलमारे, अशोक धांडे, गजानन धांडे, संपत धांडे, गोविंद बैतुले,रमेश जवंजाळ ,रामेश्वर धांडे यांच्या पत्नी व वारसांचा सन्मान करण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व तरुणांची विशेष उपस्थिती होती त्यामध्ये ग्रामसचिव ज्ञानेश्वर जायले सरपंच पती योगेश मोरे पत्रकार विठ्ठलराव गुजरकर, सुनील सपकाळ, प्रभाकर सपकाळ भाऊराव धांडे, प्रकाश राऊत परमानंद सपकाळ, नकुल धांडे ,प्रफुल धांडे ज्ञानदेव बायस्कर, रोजगार सेवक राजीव धांडे, गजानन राऊत वैभव गुजरकर, उमेश धांडे मंगेश सोनोने, विशाल काळे अक्षय धांडे, मनोज पळसकर, प्रफुल गुप्ता विशाल धांडे, नागेश राक्षस कर जि .प शाळेच्या प्रमुख हिंगणे चित्रा राऊत केंद्रप्रमुख महारुद्र हायस्कूलचे साळकर मॅडम नितीन सपकाळ ,संजय दोड, विजय पाथरीकर, पूजा टापरे, संगीता हेन्ड, पोलीस पाटील शिल्पा सपकाळ तलाठी बेलसरे अंगणवाडी सेविका प्रतिभा धांडे,भरती जवंजाळ, विद्या भांगे उर्दू शाळेचे शिक्षक अ शकिल अहमद, मुस्ताक अली, गाडगे बाबा मूकबधिर विद्यालयाचे शिक्षक नागेश खांडेकर ,प्रदीप वाकोडे धनंजय ढोले ,चेतन भुजबले रवींद्र जवंजाळ, आकाश जवंजाळ विनायक बुट्टे, संतोष पुंडकर, अजय गुप्ता अनिल गुप्ता, शरद राऊत प्रज्ञेश इंग्लिश स्कूल चे पूजा म्हसाये, हरीविजय जवंजाळ,रमेश सपकाळ संतोष सावकर, नितीन टोलमारे, पद्माकर धांडे रामदास धुमाळे ,राहुल जवंजाळ, अक्षय धांडे ,देवेंद्र पुंडकर, सुनील काळे, प्रशांत गुजरकर ,शिवशंकर सोनोने, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील सपकाळ, रामदास मेश्राम गजानन सोनखास्कर तसेच बचत गटातील महिला व बहुसंख्य ग्रामवासी विद्यार्थी याची उपस्थिती होती