प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.१६ ऑगस्ट रोजी पाथरी तालुक्यातील लिंबा येथील समस्त गावकऱ्यांच्या वतीने प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी. हा पाथरी ते सोनपेठ या रस्त्याची दशाही अत्यंत वाईट झालेली आहे वाहने चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अक्षरशः रस्त्यावर एक दोन फुटाचे खड्डे पडले आहेत याकडे कोणाचेही लक्ष राहिले नाही. वाहतुकीसाठी हा रस्ता योग्य न राहिल्यामुळे लिंबा येथील गावकऱ्यांच्या वतीने १६ ऑगस्ट रोजी सकाळी लिंबा गावात रस्ता रोको आंदोलन जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देऊन सुरू करण्यात आले. प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी पाथरी सोनपेठ या दोन तालुक्याला जोडणारा असून तो पुढे बीड व लातूर या दोन जिल्ह्यातून गेलेला आहे पण हा रस्ता आमराई फाटा ते सोनपेठ पर्यंत अत्यंत खराब झालेला आहे तो दुरुस्त करावा यासाठी लिंबा ग्रामपंचायतच्या वतीने दि.३१-७-२०२३ रोजी दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार आज लिंबा गावकऱ्यांच्या वतीने सकाळी८ वाजल्यापासून रस्ता रोको आंदोलन चालू केले आहे.