डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी
परभणी.
परभणी : ता.15 ऑगस्ट महसूल विभाग हा शासनाचा प्रशासनातील मध्यवर्ती भुमीका बजावणारा महत्वाचा विभाग आहे. ब्रिटीश काळापासून ते आजतागायत आपले अस्तित्व टिकून ठेवणारा तसेच गावपातळी पासून ते राज्यपातळी पर्यंत कार्यरत असणार्या या विभागाच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ०१ ऑगस्ट रोजी राज्यभरात महसूल दिन साजरा केला जातो. या वर्षी प्रथमच महसुल दिनाचे औचित्य साधुन या विभागाकडून देण्यात येणार्या विविध प्रकारच्या सेवा आणि योजना यांची नागरीकांना अधिकाधिक माहिती व्हावी, अधिकारी, कर्मचारी व सर्वसामान्य नागरीक यांच्यात सुसंवाद निर्माण व्हावा यासाठी ०१ ऑगस्ट ते ०७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात आला. महसूल मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील, यांनी परभणी जिल्ह्यात साजरा झालेल्या महसुल सप्ताहाची दखल घेवून या सप्ताहात जिल्ह्यात विविध कार्यक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली आहे.
परभणी जिल्ह्यात महसुल विभागाने साजरा केलेल्या महसुलसप्ताहात विविध कार्यक्रमांची माहिती आणि त्याची फलश्रुती अधोरेखीत करणारी एक माहिती पुस्तिका तयार करण्यात आलेली असून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवाचे औचित्य साधुन दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी गृहनिर्माण अतुल सावे यांच्या शुभहस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हा नियोजन सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय, येथे सकाळी ९.३० वाजता संपन्न झाले. याच कार्यक्रमात महसुला सप्ताहा बाबत जिल्हा प्रशासनाने निर्मिती केलेल्या चित्रफीतीचे प्रकाशन मंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघनाताई बोर्डीकर,जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मून, अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे, सर्व विभागप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर माहिती पुस्तिका आणि चित्रीफीतीच्या निर्मितीसाठी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री दत्तू शेवाळे,तहसिलदार महसुल श्री सुरेश घोळवे यांनी परीश्रम घेतले असून जिला सूचना विज्ञान अधिकारी श्री सुनिल पोटेकर यांनी ले-आऊट डीजायनींग, टायटलींग, शब्दांकन आणि संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे. या उपक्रमाद्वारे महसूल विभागाची सकारात्मक बाजु जनतेच्या समोर मांडण्यात प्रशासन यशस्वी झाल्याचे दिसते. या उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे आणि जिल्ह्याच्या संपुर्ण महसुल अधिकारी, कर्मचार्यांचे महसुल मंत्री यांनी मन:पुर्वक अभिनंदन केले आहे.











