प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.१५ ऑगस्ट रोजीस्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण समारंभासाठी समाजातील विविध घटकांना विशेष आमंत्रित करण्यात येते. त्यानुसारच पाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथील शिवकृषक ग्रो प्रोडूसर कंपनीच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे .केंद्र सरकारच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपनी बळकटीकरण योजनेतून एस. एफ.एसी. अंतर्गत स्थापना झालेल्या शिवकर्षक ग्रो प्रोडूसर कंपनीचे सचिव सुरेश केंदळे, व अध्यक्ष प्रतिभा कोल्हे यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांची आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहन कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली व या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण यांना मिळाले आहे,लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल सुरेश केंदळे देवनांद्रा तालुका पाथरी यांनी पंतप्रधान व केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.











