भगवान कांबळे
तालुका प्रतिनिधी माहुर
माहुर -१५ ऑगस्ट स्वातंत्रदीन मोठ्या उत्साहात माहुर नगरीत साजरा केला या मध्ये प्रामुख्याने महीनाभरा पासून चालु असलेल्या अन्नदान महाप्रसादाचे जनक द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांनी आपल्या मठा पासून आपल्या भक्तांसह पायी रॅली काढून नगर पंचायत प्रांगणात स्वातंत्रदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित झाले असता माहुर नगरीचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी द.भ.प. साईनाथ महाराजचां आदर पुर्वक सत्कार केला संह्यद्री पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली जिनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल ने अनोखी रॅली काढून त्यात त्यांनी चंद्रयान त्रीचा देखावा सादर करून माहुर नगरीमध्ये एक वेगळा उत्साहा निर्माण केला या स्वातंत्र दिनानिमित्त नगर पंचायत प्रांगणात उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत करुन माहुर नगरीचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांच्या हस्ते सकाळी तिरंगा ध्वज फडकविण्यात आला यावेळी माहुर नगरीचे सन्माननीय नागरीक, सन्मानिय नगरसेवक,सन्मानिय नगरसेविका, सन्मानिय पत्रकार, नगर पंचायत कर्मचारी वृंद, शालेय विद्यार्थी, शिक्षक वृंद केंद्रीय प्राथमिक शाळा माहुर या सर्वांच्या उपस्थित हर्ष उल्लासाने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.











