महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.१३:-केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्य दिनाच्या शुभ पर्वावर येथील नगर पालिकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.नगर पालिकेतर्फे अमृत महोस्तव कार्यक्रम अंतर्गत दि. ९ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२३ या कालावधीत ‘मेरी मिट्टी, मेरा देश’, ‘मिट्टी को नमन, विरो को वंदन’ अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जनतेत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम व साक्षरता निर्माण व्हावी. या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा. या दृष्टीने सदर अभियान राबविण्यात येत आहे. नागरीकांना स्वयंस्फूर्तीने हातात मातीचे दिवे घेऊन किंवा माती घेऊन पंचप्रण शपथ घ्यायची असुन सदर सेल्फी मेरी माटी मेरा देश या पोर्टलवर अपलोड करावयाची आहे. भारतीय शूरवीर सैनिकाच्या स्मृती प्रित्यर्थ या अभियाना निमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.त्या अनुषंगाने नगर परिषद च्या वतीने दि. ९ ऑगस्ट ला सकाळी १०.०० वाजता पंचप्रण शपथ घेण्यात आली. तसेच शिला फलक अनावरण करणे १०.१५ वाजता व ध्वजारोहन व राष्ट्रगीत गायन १०.३० वाजता व हुतात्मा दिन १०.४५ वाजता सर्व नगर पालिकेचे पदाधिकारी व नगरसेवक व कर्मचारी वृंद तसेच सर्व नागरीकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला. तसेच दि. १४ ऑगस्ट रोजी वसुधा वंदन म्हणुन ७५ देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून अमृत वाटीका करण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन करण्याकरीता न.प. सभागृहात दुपारी १.०० वाजता सन्मानित करण्यात येणार आहे. हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत मागील वर्षीप्रमाणे हर घर तिरंगा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तरी मागील वर्षीप्रमाणे दि.१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज उभारावा. १५ ऑगस्टला भद्रावती नगर परिषद भद्रावतीच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भद्रावती भूषण पुरस्कार, गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन स्थानिक मुर्लीधर पाटील गुंडावार लॉन येथे सायंकाळी ०६.०० वाजता करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर व नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांनी केले आहे.


