संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
दौंड : आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली यावेळी पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच न्हावरा – केडगाव चौफुला रस्त्याच्या संबंधित विविध समस्यांवर चर्चा केली तसेच दौंड तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी केंद्रीय रस्ते निधी मिळावा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली,याप्रसंगी खालील प्रमुख मागण्या केल्या. पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील हडपसर ते कासुर्डी टोल नाक्यापर्यंत उन्नत महामार्ग उभारण्या संदर्भात प्रस्तावास मान्यता देऊन सदर कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी. पुणे सोलापूर महामार्गावरील यवत, भांडगाव, वाखारी, चौफुला, वरवंड, पाटस , मळद, खडकी, स्वामी चिंचोली येथे ठिक ठिकाणी सर्व्हिस रोड चे काम करणेबाबत आपल्या मागणीनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी व वरील सर्व्हिस रोडची कामे सुरु करण्यात यावीत.रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे सोलापूर महामार्गावरील वाखारी, धायगुडेवाडी, भागवतवाडी तसेच कुरकुंभ येथील धोक्याची व अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करून त्यावर कार्यवाहीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे प्रस्ताव तयार करण्यात आलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी. NH- 548 DG न्हावरा – केडगाव चौफुला रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे. NH-9 पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरवंड ता. दौंड (KM 58/200) येथे अतिरिक्त अंडरपास बांधण्यात यावा. केंद्रीय रस्ते निधी द्वारे पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर खोरोडी येथे RUB (रेल्वे अंडर ब्रिज) उभारण्यात यावा. यावेळी माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते, माननीय गडकरी साहेबांनी आपल्या सर्व मागण्यांबाबत दखल घेत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.असे आमदार राहुल कुल म्हणाले.


