कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा येथील सामजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे प्रवीण मेहनकार यांची राष्ट्रवादी सोनाळा शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रसेनजित दादा पाटील,रेखा खेडेकर जिल्हाध्यक्ष,सतीश वानखडे,शाम बोरपी हजर होते.सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.मी पक्षात आपले कार्य निरंतर एकनिष्ठेने पार पाडेल अशी ग्वाही प्रवीण मेहनकार यांनी दिली.सर्व सोनाळा मित्र मंडळ यांनी त्यांना शुभेच्छा देऊन पक्षाचे आभार मानले.