कलीम शेख
तालुका प्रतिनिधी, संग्रामपुर
संग्रामपुर : दि.9 ऑगस्ट बुधवारी क्रांतीदिनी बेरोजगार शिक्षकांच्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तहसील संग्रामपूर येथे उपोषणाला बसले आहे. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आणि संग्रामपूरचे तहसीलदार आणि गट शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन तात्काळ उपोषणाची दखल घ्या आणि सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या थांबवून नवीन बेरोजगार शिक्षकांना नियुक्ती देण्याबाबत या विषयावर निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी D.Ed B Ed झालेल्या अनेक तरुण मंडळी तसेच आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्ष शेख कलीम व कार्यकर्त्यांनी सुद्धा सदर उपोषणाला पाठिंबा दिला आहे.


