प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
अधिक मासानिमित्त श्री गोपाळ कृष्ण गोशाळे त समितीचे अध्यक्ष श्री किशन जी सारड व सर्व कुटुंबीयांच्या वतीने अधिकमासा चे औचित्य साधून गोमातेस धोंडे जेवण देण्यात आले. प्रथम श्री किशन जी सारडा व कुटुंबीयांनी गोशाळेत असणाऱ्या गोवर्धन धारी श्रीकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. नंतर सर्व कुटुंबीयांच्या वतीने गायींची विधिवत पूजा करण्यात आली. व नंतर गोमातेची आरती पण करण्यात आली. व नंतर सर्व गोमातांना पोळी धोंडे भात भाजी वगैरे सर्व नैवेद्य खाऊ घालण्यात आला यावेळी श्री गोपाळ कृष्ण गोशाळेच्या समितीचे सर्व संचालक, व व्यवस्थापक कुंजबिहारी काबरा, सर्व कर्मचारी व सारडा यांचे कुटुंबीय सर्व सदस्य उपस्थित होते.


