भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव: आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ‘मेरी मिट्टी मेरा देश’अभियानांतर्गत पंचायत समिती,शिक्षण विभाग,शेवगाव यांनी शेवगाव तालुक्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले होते.त्यानुसार इ 5वी ते इ:10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थी बसून विद्यालयात ही स्पर्धा आयोजित केली होती. इयत्ता 5वी च्या 21विद्यार्थ्यांनी 6वी ते 8वीच्या 59 विद्यार्थ्यांनी व 9वी 10वीच्या 16 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला प्रत्येक गटातून प्रत्येकी प्रथम, द्वितीय व तृतीय तीन क्रमांक काढण्यात आले.झाडे लावा झाडे जगवा,आजादी का अमृत महोत्सव व मतदान जागृती अभियान या विषयावर विद्यार्थ्यांनी चित्रे रेखाटली. विद्यार्थ्यांनी कल्पकतेने आपले विचार या चित्रांमध्ये रेखाटले तसेच सुंदर रंग देखील भरले चित्र काढण्यामध्ये सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते.या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक शीतलकुमार गोरे यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते,उपमुख्याध्यापिका मंदाकिनी भालसिंग,पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड,पर्यवेक्षक सुनील आव्हाड हे उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे उपस्थित मान्यवरांनी खूप कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.


