डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी, परभणी
परभणी : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3.30 वाजता जिल्हा पुरवठा अधिकारी डाॅ गोविंद रनविरकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.बैठकीत ग्राहक संरक्षण परिषदेचे सर्व शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. ग्राहकाची फसवणूक झाली तर त्वरित प्रशासनाच्या व अशासकीय सदस्यांच्या माध्यमातून संबंधिताला न्याय मिळावा यासाठी जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने परभणी जिल्हा अधिकारी कार्यालयात ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. सुरूवातीला मागील बैठकीचा आढावा घेण्यात आला. तदनंतर बैठकी दरम्यान दाखल झालेल्या ग्राहक नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. सदर तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीचा लिखीत अहवाल ग्राहक संरक्षण परिषदेत व त्याची एक प्रत संबंधित तक्रारदारास पुढील बैठकीत देण्याचा ठराव घेण्यात आला.यावेळी ग्राहक संरक्षण परिषदेचे गट समन्वयक प्रमुख डॉ विलास मोरे यांनी शासकीय व अशासकीय सदस्यांना मार्गदर्शन केले, यावेळी धाराजी भुसारे, जनार्धन आवरगंड, मधुकर मुळे, सतीश जाधव, गुलाबराव शिंदे, जनार्धन आवरगंड यांनी ग्राहकांचे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले. यासंदर्भात पुढच्या बैठकीत यावर माहिती देण्यात येईल असे ग्राहक संरक्षण परिषदेचे सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रनविरकर यांच्यावतीने सांगण्यात आले शेवटी उपस्थित सदस्यांचे आभार मानून बैठकीचा समारोप करण्यात आला.