संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
नागेश्वर वि.का.सोसायटी केडगाव रिक्त झालेल्या पदासाठी बुधवार दि. ९/०८/२०२३ रोजी निवडणूक पार पडली त्यामध्ये शहाजी महादेव शेळके यांचं एकमेव आर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गेल्या काही महिन्यापूर्वी नागेश्वर सोसायटीची निवडणूक पार पडली होती. त्यामध्ये राजेंद्र शेळके हे निवडून आले होते मात्र त्यांची निवड अवैध ठरल्याने त्यांचे पद रिक्त झाले होते. त्या रिक्त झालेल्या पदाची आज निवडणूक पार पडली. या पदासाठी शहाजी शेळके यांचा एकमेव अर्ज उपलब्ध झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन.टी राठोड यांनी काम पाहिले.
शहाजी शेळके यांची बिनविरोध निवड जाहीर होताच संचालक मंडळ व ग्रामस्थांनी एकच जल्लोष करत शहाजी शेळके यांचे पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देऊन त्यांचे अभिंनदन केले. यावेळी केडगाव पंचक्रोशीतील सोसायटीचे आजी-माजी संचालक, पदाधिकारी उपस्थित होते तर मोहन शेळके, सचिन शेळके, राजाराम शेळके, धोंडीबा शेळके, विठ्ठल चव्हाण, समाधान हंडाळ, अरुण देशमुख, प्रमोद निंबाळकर, विकास कांबळे, संपत शेळके,शोभा देशमुख,अंजना शेळके, विलास शेळके, गोरख शेळके, मनोज शेळके, दत्ता शेळके, राजेंद्र शेळके, उत्तम देशमुख, राहुल शेळके हे आवर्जून उपस्थित होते.यावेळी उपस्थितांचे आभार धनंजय शेळके व विजयकुमार शेळके यांना मानले .