राजेंद्र पोटफोडे ग्रामीण प्रतिनिधी, अमरापूर
अमरापूर: शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे दलितवस्ती स्मशानभूमी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या प्राणांगणामध्ये मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अंतर्गत रोपवाटिका महोत्सव वृक्ष लागवड करण्यात आले.तसेच पंचप्रण शपथ देण्यात आली,त्याप्रसंगी शेवगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेंद्रजी कदम साहेब तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी दीप्ती गाठ मॅडम सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते.