संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
दौंड : ग्रामीण भागात गरिबांचे घरांची स्वप्न पूर्ण करण्यात महत्त्वाचा कणा असलेल्या राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती स्तरावरील ग्रामीण गृहनिर्माण अभियंते १ ऑगस्टपासून संपावर गेले असून शासनाची घरकुल योजना कोलमडली असून यामुळे अनेक गरीब कुटुंबांची पक्के घराचे स्वप्न यामुळे लांबले आहे. ज्या आभियांत्यांच्या मदतीने केंद्र व राज्य शासन घरकुलाचे उद्दिष्ट साध्य करत आहे त्याच घरकुल निर्माण अभियंत्यांना कित्येक दिवसापासून मानधन मिळाले नाही, काहीना मिळाले तर फार तुटपुंजे या मानधनावर घर कसे चालवणार? मुला बाळांना शिक्षण कसे देणार ?या महागाईच्या जमान्यात तारेवरची कसरत करावी लागत आसून तरीही शासन यांच्या मानधनाकडे लक्ष देत नसल्यामुळे गृहनिर्माण अभियंता संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक दिली असल्याचे संपात सहभागी आभियांत्यानी सांगितले.
या संपामुळे मागेल त्याला घरकुल या योजनेची बोजवारा उडण्याची चिन्ह दिसत असून महाआवास अभियान याच ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी यशस्वी केलं होतं व ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल आवास योजना ,शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, आदिम कोलम आवास योजना,पारधी घरकुल योजना, या योजनांची सर्वात जास्त घरकुल ग्रामीण भागात याच अभियंत्यांनी पोचली आहे.. परंतु ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी मानधनासाठी संप पुकारल्यामुळे गोरगरीब जनतेची घरकुल आवास योजनेतील घरे मात्र अपूर्ण राहणार आहेत..
कोटासाठी
आम्ही 2016 पासून अत्यंत तुटपुंज्या मानधनात प्रखरपणे काम करत आहोत परंतु आम्हाला वेळेत मानधन मिळत नसल्यामुळे लाभार्थ्यांचे घरकुलास भेटी देण्यासाठी तसेच आमच्या कुटुंबीयांची उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक व मानसिक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे आम्हाला प्रलंबित मानधन 31 जुलै पर्यंत अदा करण्यात यावे अन्यथा आम्ही १ ऑगस्ट 2023 पासून या महाराष्ट्रभर मानधन मिळेपर्यंत काम बंद आंदोलन करीत आहोत. ओंकार खताळ
ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, दौंड