रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा =हिवरखेड येथील सेंटपॉल अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी ओलंपियाड परीक्षेमध्ये सहभागी होऊन परीक्षे मध्ये नेत्रदीपक यश संपादन केले या परीक्षे मध्ये आठ विद्यार्थ्यांना रौप्य पदक (सिल्वर मेडल) तसेच आठ विद्यार्थ्यांना ओलंपियाड तर्फे गिफ्ट व्हाउचर देण्यात आली तसेच शाळेला उत्कृष्ट शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांतजी तिवारी सर ,निमिता गांधी मॅम, विमल येऊल मॅम ,रवींद्र वसे सर व ओलंपियाड परीक्षा विभाग प्रमुख अतिक सर ,मानके मॅम ,ढोले मॅम ,दहि सर , डेरे मॅम व पालकांना देतात. संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटिया, लुणकरण डागा व संस्थेचे सचिव प्रमोद चांडक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.