सतिश गवई
तालुका प्रतिनिधी उरण,
उरण: १ऑगस्ट रोजी उरण- पनवेल महामार्गावरील गव्हाण उड्डाणपूलवर भिषण अपघात झाल्याची घटना घडली असून यामध्ये एक प्रवासी मृत्यू मुखी पडला आहे. पनवेल वरुन उरण च्या दिशेने येणाऱ्या इको गाडीला ट्रेलरने धडक दिली.उरण – पनवेल मार्गावरील गव्हाण ब्रिजवर हा भिषण अपघात झाला. अपघातावेळी इको कारमधून पाच प्रवासी प्रवास करत होते.यामध्ये ड्रायव्हर व इतर प्रवासी थोडक्यात वाचले असून ड्रायव्हर सीट च्या बाजूला बसलेले तेलंगे प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत.उरण – पनवेल मार्गावर बेफामपणे वाहने हाकवणारे अवजड वाहनाचे चालक या दुर्घटनांना जबाबदार असल्याचे नागरिक सांगत आहेत.घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.


