किरण नांदे
शहर प्रतिनिधी, ठाणे
१४ जुलै रोजी प्रक्षेपण करण्यात आल्यापासून चंद्रयान ३ ने चंद्रच्या दिशेने ६५ अंतर कापले आहे, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने शुक्रवारी सांगितले.
आत्तापर्यत काय झाले?: प्रक्षेपणानंतरच्या तीन आठवड्यात पाच वेळा इस्रोने चंद्रयानाला पृथ्वीपासून एका नंतर एक कक्षा ओलांडत दूरच्या कक्षेत स्थापित केले.त्यानंतर १ ऑगस्ट रोजी त्याला पृथ्वीच्या कक्षेतून यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत पाठवण्यात आले.या प्रक्रियेनंतर (ट्रान्स लुनार -इंजेक्शन )चंद्रयान ३ पृथ्वीला प्रदक्षीणा घालण्याचे थांबवून चंद्राच्या सानिध्यात जाण्याच्या मार्गावर अग्रेसर झाले आहे. चंद्राच्या सर्वात जवळ….शनिवारचा दिवस या यानासाठी अत्यंत महत्वाचा असेल. या दिवशी आणखी एका प्रक्रियेद्वारे (लुनार ऑर्बिट इंजेक्शन )त्याला चंद्राच्या कक्षेत स्थापित करण्यात येणार आहे.शनिवारी सायंकाळी सात वाजता ही प्रकिया केली जाईल.चंद्रयान चंद्राच्या सर्वात जवळ असताना ही प्रक्रिया पार पडेल असे इस्रोने सांगितले.


