सुशांत कदम
ब्युरो चीफ ठाणे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहापूरमधील सरलांबे गावात समृद्धी महामार्गाच्या बांधकामावेळी गर्डर आणि लौंचर कोसळून झालेल्या दुर्घटना स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली..ही दुर्घटना नक्की का घडली त्यामागे नक्की काय करणे कारणीभूत आहेत याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल तसेच कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटूंबियांना राज्य शासनाने 5 लाख रुपयांची तर केंद्र शासनाने 2 लाखांची मदत जाहीर केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिलेली प्रतिक्रिया..