सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. १ ऑगस्ट २०२३ बीड जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी दि. ३१ जूलै २०२३ प्रेरणा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या परीक्षेस जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी दांडी मारल्याचे प्रकार घडले आहेत.
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी जिल्ह्याभरातील शिक्षकांसाठी दि.१ ऑगस्ट २०२३ रविवार पासून या परीक्षेस सुरुवात झाली असून या परीक्षेस जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी दांड्या मारल्याच्या घटना घडल्या आहेत. सुनिल केंद्रेकर आयुक्त असताना जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रेरणा परीक्षेसाठी नोंद करण्यात आली होती. परंतु सुनिल केंद्रेकर यांनी आयुक्त पदाचा राजीनामा दिल्यामुळे यांचा परिणाम परीक्षेवर पडल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातील ७७१७ पैकी ७१०० विद्यार्थ्यांनी या प्रेरणा परीक्षेकडे पाठ फिरवली. दि. १ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या प्रेरणा परीक्षेसाठी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, अशा तीन विषयाची परीक्षा घेण्यात आली यावेळी ७७१७ पैकी फक्त ६१४ शिक्षकांनी प्रेरणा परीक्षेचा पेपर दिला. दि. १ ऑगस्ट २०२३ सोमवार रोजी गणित विषयाला ६१७ इंग्रजी विषयाला ६१५ तर समाजशास्त्र विषयाला ६१३ शिक्षकांची उपस्थिती दर्शविली जिल्ह्यातील अंबाजोगाई – ८३, आष्टी – ३०२, बीड – ११७५, धारूर – ४७२, गेवराई – १३२०, केज – ११३५, माजलगाव – ६८५, पाटोदा – ५००, परळी – ९००, शिरूर – ६७३, वडवणी – ४७२ एकूण – ७७१७ शिक्षकांनी प्रेरणा परीक्षेसाठी नोंदणी केली होती. तर बीड जिल्ह्यातील धारूर, पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील एकाही शिक्षकांनी या परीक्षेस उपस्थिती दर्शविली नाही. बीड जिल्ह्यातील जे शिक्षक या परीक्षेस उपस्थित राहिले नाहीत अशा शिक्षकांवर मुख्यकार्यकारी अधिकारी स्वतः निर्णय घेणार असून शिक्षण विभाग याबाबत अहवाल देइल त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)