डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी, परभणी
परभणी : नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहेर बोरगाव येथे आज दि.१ अगस्त रोजी लोकमान्य टिलक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. बिडवे सर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच श्री. लाडाने सरांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सर्जेराव लहाने सर यांनी केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ताल्डे सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन आवचार सर यांनी केले. चोकणपळे, पवार सर, श्री. काळे शिवाजी, श्री. पुंगळे कैलास यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या जीवन कार्यावर भाषण केले.


