शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी.नांदुरा
खामगाव येथे मनुवादी, जातियवादी, संभाजी भिडे ची सभा आयोजित करण्यात आली होती. ह्या सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी वंचित बहुजन आघाडी जिल्हा कडुन निवेदनाद्वारे केली होती.
म्हणुनच आज सकाळ पासून पोलीस प्रशासन वंचित नेते व कार्यकर्ते यांच्या वर डोळा ठेऊन होते. जेव्हा जिल्हा अध्यक्ष निलेश जाधव व जिल्हा नेते प्रशांत वाघोदे यांचा ताफा कोथळी वरून निघाला तेव्हा गोशिंग या ठिकाणी हा ताफा अडवण्यात आला पण पोलिसांना हुलकावणी देत गाड्या खामगाव कडे निघाल्या आणी निपाणा पेट्रोल पंपावर बोराखेडी पोलिसांनी हा संपूर्ण ताफा अडवुन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या वेळी काळे झेंडे दाखवून संभाजी भिडे मुर्दाबाद सरकार हमसे डरती है पोलीस को आगे करती है.अशा घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.या वेळी, जिल्हा अध्यक्ष निलेश जाधव, जिल्हा नेते प्रशांत वाघोदे, मिलिंद वानखेडे, नवनित सिरसाट, शेषराव उमाळे, तालुकाध्यक्ष समाधान डोंगरे, प्रशांत बोदडे, महासचिव विशाल मोरे,गजानन बोराडे सर,सचिव संदिप गवई, सागर धुरंधर, मुकेश इंगळे, राष्ट्रपाल खंडारे, उमेश वानखेडे, मिलिंद इंगळे, सागर बोदडे, व बुलडाणा येथून आलेले कार्यकर्ते व इतर कार्यकर्तेंना अटक करण्यात आली होती.