अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : शिर्ला आज दि. 31 जुलै 2023 रोजी पातूर तालुक्यातील शिर्ला खदान येथील किरण अर्जुन बळकार 19 वर्षीय युवती च्या हत्याकांडाची माहिती मिळताच आद.युवराज सुजात आंबेडकर यांनी शीर्ला येथे युवती च्या घरी जाऊन सखोल चौकशी करून हमी दिली आणि वंचित बहुजन आघाडी तुमच्या सोबत आहे तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले.यावेळी सुजातदादा आंबेडकर यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, पातुर तालुका अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश धर्माळ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर,जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख, शरद सुरवाडे तालुका महासचिव, सभापती पती अर्जुन टप्पे,उपसभापती इमरान खान मुमताजखान, चंद्रकांत तायडे,अनिल राठोड, दिनेश गवई, शाम ठाकरे, दीपक इंगळे, राजू बोरकर,राजेश महले, सम्राट तायडे, नितीन हिवराळे, विनय दाभाडे, प्रशिक इंगळे, निखिल खंडारे,अनिकेत इंगळे आदी उपस्थित होते.